First things first so let me tell you that today I am feeling very happy. Wow, how happy I am! 😀 So, few days ago I had submitted an article to one of our regional newspaper “Maharashtra Times” based on “Hangout Place” of friend circle. The article was supposed to be published under their section “Katta Gang” meaning friend’s regular hangout place wherein one can share his memories and love towards their hangout place. I did the same and now today it has shown up in newspaper. I am feeling very happy, as it is a non-edited version of what I had submitted. Thank you so much Maharashtra Times for giving opportunity and space to share my memories towards the place and my friends. And, not to mention, THAWW GANG ROCKED AGAIN!!!
Now, some people will say that what’s the big deal? Getting published in Regional Language Newspaper under particular section wherein they wait to receive something to publish is not a big achievement, but let me tell you even when it is simple and easy, you need desire to do the things and I am glad that I did. Well, it is not that easy though.
You can find the main article below but well it is in local language Marathi. So be aware of that. Thanks for reading.
Cheers and love!!!
___pr@t
नाशिकमध्ये राहणारे आम्ही जिवलग मित्र आणि आमच्या ग्रुपचं नाव “ठॉ” गँग (Thaww Gang). कॉलेज संपून २ वर्ष झाली पण आमची मैत्री अजूनही होती तशीच आहे . आता कॉलेजचे मित्र म्हंटले की त्यांना जोडून कट्टा आलाच आणि आमचा सगळ्यांचा आवडता कट्टा म्हणजे “आइस एंड स्पाईस “. खरं तर हे आमच्या कॉलेजपासून जवळच असलेलं एक महागडं रेस्टोरेण्ट पण त्याचा आणि आमच्या कट्ट्याचा संबंध तो फक्त नावापुरता. आमचा खरा कट्टा होता तो त्या हॉटेल जवळच असलेली एक छोटीशी खानावळ (मेस) “हॉटेल चविष्ट”. कॉलेजमध्ये इतर कोणी विचारलं की कुठे जातंय तर आम्ही “”आइस एंड स्पाईस” चं नाव सांगायचो आणि आम्ही तिथे रोज जातो हे ऐकून बाकीच्या मुलांचा गोंधळ उडायचा. इतके महागडे हॉटेल आम्हाला रोज कसे काय परवडते याचं त्यांना आश्चर्य वाटायचं आणि आम्हाला त्याचं खूप हसू यायचं.
दिसायला छोट्याशा टपरी एवढी ही खानावळ होस्टेलच्या मुलांसाठी जेवणाचं ठिकाण होती, मात्र आमच्यासाठी तो आमचा कट्टाच . कॉलेजच्या सुरवातीच्या वर्षी पासूनच आम्ही तिथे लेक्चर्स बंक करून वेळ घालवायला यायला लागलो होतो. दिवस जात होते आणि आमच्या छोटछोट्या गोष्टीतल्या सुंदर आठवणी तिथेच रूप घेत होत्या . कधी डबा खायला तर कधी वाढदिवसाचा केक कापायला, कधी अभ्यास करायला तर कधी नुसत्याच गप्पा मारायला तिथल्या ५ -६ खुर्च्या आणि २ प्लास्टिकचे टेबल आमच्या सेवेत सज्ज असायचे. आमच्या ग्रुपच्या अनेक योजना इथेच आखल्या जायच्या आणि कुठेही जाण्याआधी भेटण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हा कट्टा. कोणाला भेटावे वाटले, कोणाला आठवण आली, कोणाला कुठे काही काम असले की सगळे जण इथेच जमायचे. इथली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे मेसवाले काका आणि काकू . त्याचं प्रत्येकासोबत एक नातंच तयार झालं होतं. ते दोघे कधीच कोणाला रागवत नव्हते, अगदी आम्ही निव्वळ टाईमपास करण्यासाठी आलेलो असलो तरी. त्यांचा स्वभाव खरच गोड होता. इथे आम्ही खूप मजा केलीय, मस्ती केलीय, आयुष्यातला खूप आनंदी वेळ इथेच घालवला आहे. इथला चहा, कोल्ड ड्रिंक्स, ताक, चोकलेट्स आणि काहींनी सिगरेट्स खूप एन्जोय केल्या आहेत.
ह्या कट्ट्यावर आम्ही सगळच शेअर केलय मग तो आनंद असो वा दु:ख. खूप गप्पा मारल्या आणि धिंगाणाही घातला. पुढे जाउन आमच्या कट्ट्याचं शॉर्टनेम तयार झालं आणि आता मेसेजमध्ये फक्त “INS” हे नाव आम्ही वापरू लागलो. त्या तीन शब्दांचा अर्थ आज ही फक्त आम्हालाच कळतो.
कॉलेजचे दिवस संपले आहेत, मित्र वेगवेगळ्या शहरात राहताय. आता पहिल्यासारखं नेहमी नेहमी भेटणं शक्य होत नाही, मात्र आजही सगळ्या गोष्टी होत्या तशाच आहेत. आमचे सगळे प्लान्स ह्या कट्ट्या पासूनच चालू होतात. म्हणून आजही कोणाला आठवण आली की त्याचं वाक्य ठरलेलं असतं… “INS” वर भेटा रे.
Congrats pratik such wander full moment
Thank you so much buddy… 🙂